Ganesh Naik : राज्यावर ११ लाख कोटींचे कर्ज

गणेश नाईक यांच्या कबुलीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ganesh Naik Statement
Ganesh Naikpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : राज्याच्या डोक्यावर तब्बल ११ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची कबुली देत भाजप नेते तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. मात्र, कर्ज कोणाच्या हौसमौजेसाठी घेतलेले नसून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करण्यात आल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पालघर येथे जनजाती गौरव सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

‘सत्य दडपून चालत नाही, सत्याला सामोरे जावे लागते,’ असे स्पष्ट मत मांडत नाईक यांनी राज्यावरील कर्जाचा आकडा मान्य केला. राज्याच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा असताना त्यामागील कारणेही समजून घेतली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Ganesh Naik Statement
JNPT Container Business : शासकीय अनास्थेने कंटेनर डेपो उद्योग संकटात

राज्यावर असलेले हे कर्ज वैयक्तिक हौसमौज किंवा चैनीसाठी घेतलेले नसून विकासाच्या विविध प्रकल्पांसाठी वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासारखे महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशनअंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आल्याचा दाखलाही त्यांनी दिला.

दरम्यान, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सत्ताधारी पक्षातीलच वरिष्ठ नेत्याने दिलेली कबुली राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. एका बाजूला ११ लाख कोटींच्या कर्जाचा स्वीकार, तर दुसरीकडे विकासकामांसाठी घेतलेल्या कर्जाचे समर्थन, अशा दुहेरी भूमिकेमुळे नाईक यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा आणि विकासासाठी होणाऱ्या खर्चाचा ताळेबंद हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Ganesh Naik Statement
Mumbai Air Pollution : पालिका उभारणार पाच हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.