Mumbai Air Pollution : पालिका उभारणार पाच हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे

मुलुंड, दादर, गोरेगाव, चर्नी रोड आणि सांताक्रूझचा समावेश, २२ कोटींचा खर्च
Mumbai Air Pollution
मुलुंड : गेल्या काही दिवसांत मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम ते अतिवाईट श्रेणीत नोंदवला गेल्याने हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुलुंड : मुंबईत खालावत चाललेल्या हवेच्या गुणेवतेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच, मुंबई महापालिकेने आणखी पाच नवीन हवेची गुणवत्ता मोजणारी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या नव्या प्रकल्पांतर्गत मुलुंड, दादर, गोरेगाव, चर्नी रोड आणि सांताक्रूझ या प्रमुख परिसरांमध्ये ही केंद्रे सुरु उभारली जाणार आहेत.

मुंबईमध्ये सध्या पालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेद्वारे चालवली जाणारी अशी २९ निरीक्षण केंद्रे आहेत. या केंद्रांमधून मिळालेला डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'समीर' या राष्ट्रीय वायू गुणवत्ता निरीक्षण डॅशबोर्डवर पाठवला जातो.

Mumbai Air Pollution
Mumbai Cyber Crime : डिमॅट खात्यावर सायबर चोरांचा डल्ला

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रस्तावित पाच केंद्रांपैकी दोन केंद्रे पालिकेच्या सध्याच्या सुविधांची जागा घेतील. उर्वरित तीन केंद्रे अशा ठिकाणी स्थापित केली जातील, जिथे पाच किलोमीटरच्या परिघात कोणतीही देखरेख सुविधा नाही. दादर, चर्नी रोड आणि मुलुंड येथे सध्या एकही देखरेख केंद्र नाही. या सुविधा सहा महिन्यांच्या आत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, ही ठिकाणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. या सुविधा आजूबाजूच्या परिसरातील हवेच्या सामान्य गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी शहरी पार्श्वभूमी निरीक्षण केंद्रे म्हणून काम करतील. आम्ही सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून, नवीन प्रस्तावित केंद्रे उभारण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य जागा निवडल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Air Pollution
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघातासंबंधीच्‍या पोस्‍टरची चर्चा

गुणवत्तेची अचूक माहिती

सध्या मुंबईत महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था यांच्यामार्फत एकूण २९ हवा मोजणी केंद्रे चालवली जात आहेत. या सर्व केंद्रांवर गोळा होणारा डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'समीर' या राष्ट्रीय डॅशबोर्डवर पाठवला जातो. नवीन पाच केंद्र सुरू झाल्यानंतर मुंबईचे हवा गुणवत्ता निरीक्षण जाळे आणखी मजबूत होईल आणि नागरिकांना हवेच्या गुणवत्तेची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.