Palghar Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपीने सन २०२१ मध्ये फिर्यादीला प्रेमाची मागणी घातली होती.
Palghar Crime News
Palghar Crime Newsfile photo
Published on
Updated on

कासा: डहाणू तालुक्यातील मुरबाड पेंढरपाडा येथील एका १८ वर्षीय तरुणीला अल्पवयीन असतानाच लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवणे, ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात घडवून आणणे तसेच तिच्या व तिच्या कुटुंबीयांना धमकावून लग्नास नकार दिल्याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी देवीदास सदू ठाकरे (वय २५, रा. मुरबाड पेंढरपाडा, ता. डहाणू, जि. पालघर) याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ६४(२)(ड), ६९, ३५२ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ मधील कलम ४(२) व ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Palghar Crime News
Panvel Illegal Gutkha Sale: पनवेलमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री; कारवाईचा धाक संपला, छाप्यांनंतरही चढ्या दराने विक्री

फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपीने सन २०२१ मध्ये फिर्यादीला प्रेमाची मागणी घातली होती. त्यानंतर सन २०२३ मध्ये लग्नाचे आश्वासन देत ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या संबंधातून फिर्यादी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपीने फिर्यादी व तिच्या आई-वडिलांना धमकावून अखेरीस लग्न करण्यास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. संबंधित घटना जून २०२३ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत मुरबाड पेंढरपाडा येथे घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Palghar Crime News
Mahadev Jankar Land Fraud: माजी मंत्री महादेव जानकर यांची जमीन व्यवहारात १५ कोटींची फसवणूक

या प्रकरणी फिर्यादीने ३१ जुलै रोजी मध्यरात्री कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन डोंगरे करीत असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news