Palghar | तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्याला भीषण आग | पुढारी

Palghar | तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्याला भीषण आग

बोईसर, पुढारी वृत्तसेवा : तारापूर एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यात शनिवारी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओयझर केमिकल कारखान्यात ही घटना घडली. या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एन 60 मध्ये असलेल्या ओयझर केमिकल कारखान्यात वेल्डिंग करण्याचे करण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागली. यामध्ये छतावर बसविण्यात आलेले प्लास्टिकचे पत्रे जळून खाक झाले आहेत. मात्र, कंपनीतील कुठलेही साहित्य जळाले नसल्याचे समजते.

हे ही वाचा :

Back to top button