नाशिक/सिडको : कंपनीतच कामगाराची आत्महत्या

आत्महत्या
आत्महत्या

सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीत कृष्णनगर येथे अ‍ॅक्वा कंपनीत कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत दातीरमळा भागातील कृष्णनगर येथे ए-वन अ‍ॅक्वा कंपनीतील कामगार रामदास पंडित कांबळे (24) याने गुरुवारी सायंकाळी 6 पूर्वी कंपनीतच वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नसून मृत कांबळे हा एकटाच कंपनीतच राहत होता. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news