बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी हा फडणवीसांचा मोठेपणा : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी हा फडणवीसांचा मोठेपणा : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी संधी दिली, अशा भावना नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्‍त केल्या.

ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते, तेथे विकासात कोणताही अडथळा येत नाही. हे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करू आणि राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम करू, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजप, एकनाथ शिंदे यांचा गट आणि 16 अपक्ष आमदार यांच्या सहीचे पत्र सादर केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरे तर फडणवीस हे त्यांच्याकडे 120 आमदार असल्याने मुख्यमंत्रिपद घेऊ शकले असते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली. त्याबद्दल नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे आभार

Back to top button