श्रमिकनगर परिसरात घंटागाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या चेतन भुजबळ यास गेल्या दोन दिवसापासून भंगार व्यवसायिक असलेल्या साजन नामक व्यक्तीकडून मारहाण होत आहे. दरम्यान आज बुधवार (दि. 3) सकाळी घंटागाडी कर्मचारी चेतन भुजबळ हे आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जात असताना चार जणांच्या टोळक्याने रॉड तसेच चोपर ने त्यांच्यावर हल्ला केला. गाडीतील भंगार मला का विकत नाही अशी विचारणा करुन व्यावसायिकाने मारहाण तर केलीच याशिवाय भंगार मला न विकल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही भंगार व्यवसायिकाने घंटागाडी कर्मचा-याला दिली आहे.