पिंपरी : वेतनवाढीपासून सुरक्षारक्षक वंचित | पुढारी

पिंपरी : वेतनवाढीपासून सुरक्षारक्षक वंचित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांची गेल्या अनेक वर्षांपासून वेतन वाढीची मागणी प्रलंबित असल्याने कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षा रक्षकांना वाढीव वेतन, विविध भत्ते, खाकी गणवेश, कर्ज पुरवठा, स्वेटर, बूट, रेनकोट वेळेवर मिळत नाहीत. तसेच, कर्मचार्‍यांना दर महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळत नसल्याचे सुरक्षारक्षक अनिल पारधी सांगितले.

सुरक्षा रक्षकांसाठी जीवनधारा पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. या परसंस्थेमधून काही सुरक्षा रक्षकांनी कर्ज काढले आहे. अनेकांनी त्याची परतफेडही केली आहे. परंतु, अद्याप त्यांना कर्जचे हप्ते फेडण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या वेतनातून होणारे कर्जाचे हप्ते त्वरित बंद करावेत, अशी मागणी महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघाचे पुणे जिल्हा सचिव तुकाराम कुंभार यांनी मंडळाकडे केली आहे. तसेच, मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक वेतन वाढीची मागणी करत आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी वेतन वाढीची मागणी केली आहे.

Back to top button