नाशिक : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टेम्पोची धडक बसल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशवाडी परिसरात सोमवारी (दि.२७) रात्री घडली. अपघातात अंकुश जालिंदर जाधव (३२, रा. गणेशवाडी) या युवकाचा मृत्यू झाला. अंकुश जाधव हे त्यांच्याकडील दुचाकीवरून सोमवारी (दि. २७) रात्री बाराच्या सुमारास सराफबाजाराच्या दिशेने जात होते. त्यावेळी गणेशवाडीतील आयुर्वेदिक दवाखान्यासमोर गंगाघाटाकडून गणेशवाडीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची अंकुशच्या दुचाकीस धडक बसली. यात गंभीर मार लागल्याने अंकुशचा मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पोचालक अरविंद विजयनाथ यादव (२७, रा. घाटोळ मळा, कामगार नगर) हा फरार झाला. याप्रकरणी बजरंग भाऊसाहेब शिंदे (२२, रा. सराफ बाजार) याच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस ठाण्यात टेम्पोचालक अरविंद यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news