नाशिक : खांद्यावर हात ठेवल्याने पत्नीची पतीच्या कानशिलात, पतीकडून चाकूने वार

नाशिक : खांद्यावर हात ठेवल्याने पत्नीची पतीच्या कानशिलात, पतीकडून चाकूने वार
Published on
Updated on

नाशिक/सिडको : पतीने खांद्यावर हात ठेवला म्हणून संतापलेल्या पत्नीने शिवीगाळ करीत पतीच्या कानशिलात लावल्याने, संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित पत्नीच्या फिर्यादीनुसार, चुंचाळे शिवारात राहणार्‍या पतीने पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला. याचाच राग आल्याने पत्नीने पतीच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे पतीने रागाने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढे दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, पतीने किचनमधील चाकूने पत्नीच्या गळ्यावर आणि कानावर वार केले. तसेच स्वत:ही गळ्यावर वार करून दुखापत करून घेतली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news