मलकापुरात प्रधानमंत्री आवास योजनेची कामे सुरू | पुढारी

मलकापुरात प्रधानमंत्री आवास योजनेची कामे सुरू

कराड : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपरिषदेने घटक क्र. 4 अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलाचा लाभ देणे या घटकाखाली एकूण 5 प्रस्तावाअंतर्गत 319 घरकुलांना केंद्रीय सनियंत्रण व मंजूर समितीने मान्यता दिलेली आहे. यापैकी बहुतांश घरकुलांची कामे सुरु आहेत.

सदरचे घरकुल बांधणेसाठी 2.50 लक्ष अंदाजपत्रकीय अनुदान मंजूर आहेत. यापैकी केंद्र शासनाकडून रक्कम 1.50 लक्ष व राज्य शासनाकडून रक्कम रु. 1.00 लक्ष निधीची तरतुद करणेत आलेली आहे. त्यापैकी राज्य शासनाकडून 203 घरकुलांसाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची प्रती घरकुल 1.00 लक्ष प्रमाणे निधी 203 लक्ष प्राप्त झाला असून उर्वरित 116 घरकुलांना 116 लक्ष अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. तथापि, केंद्र शासनाकडून 319 मंजूर घरकुलापैकी 112 घरकुलांसाठी पहिला हप्त्याची रक्कम 55.20 लक्ष निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित 423.30 लक्ष निधी प्राप्त झाला नसल्याने लाभार्थींना घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या अनुषंगाने ना. सतेज पाटील यांना समक्ष भेटून केंद्र व राज्य शासनाचा उर्वरित निधी लवकर मिळणेबाबत मुख्य अभियंता-2, प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, म्हाडा, गृहनिर्माण विभाग यांना सूचना देणेबाबतची विनंती केली. त्याअनुषंगाने ना.सतेज पाटील यांनी मलकापूर नगरपरिषदेचे कार्यक्षेत्रामधील घरकुलांना केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळणेकामी विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्य अभियंता यांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने मुंबई येथे शुक्रवार, दि.3 जून रोजी सायं. 4.30 वाजता बैठकीचे आयोजन करणेत आलेले आहे. यामुळे मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामधील याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर असणारे अनुदान मिळणे सुलभ होईल.

Back to top button