नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल, पिंपळगाव बसवंत येथील मेळाव्यात प्रतिपादन

नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल, पिंपळगाव बसवंत येथील मेळाव्यात प्रतिपादन

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात सेवकांचा पगार न थांबवता 'मविप्र'ने समाजात आदर्श निर्माण केला. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या मुलांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला, असे प्रतिपादन राजेंद्र मोगल यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्समध्ये शुक्रवारी (दि.26) झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, राजेंद्र मोगल यांनी प्रगती पॅनलला पाठिंबा जाहीर केला. मविप्र संस्थेसाठी येत्या रविवारी (दि.28) मतदान होत आहे. त्यादृष्टीने प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांचा प्रचार सुरू असून, पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माधवराव मेंगाणे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, राजेंद्र मोगल, नीलिमा पवार, केदानाना आहेर, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, नानासाहेब महाले, दत्ताकाका गडाख, सुरेश कळमकर, आनंदराव बोराडे, चेतन पाटील, शिवाजीराव बस्ते, साहेबराव मोरे, दिलीप मोरे, सोमनाथ मोरे, पंढरीनाथ देशमाने, भास्करराव बनकर, संपत वाटपाडे, सिंधु आढाव उपस्थित होते. यावेळी ओझर, कोकणगाव, शिरवाडे वणी,पालखेड व खेडलेझुंगे येथे सभासदांच्या पाठिंब्यात सभा पार पडल्या.

शरद पवार हे नेहमी आदर्श : नीलिमा पवार
विरोधक करीत असलेले आरोप निराधार असून, शरद पवार हे माझ्यासाठी व समाजासाठी कायम आदर्श आहेत. संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणासाठी 294 कोटी रुपयांच्या 62 इमारती उभारल्या आहेत. 337 एकर जमिनीची खरेदी केली. विरोधकांकडून खोटा अपप्रचार सुरू असून, ऑडिट रिपोर्ट खोटा असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. संस्थेत आर्थिक शिस्त लावली. ऑडिट विभाग सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news