

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जळगाव कारागृह मध्ये असणार्या पवन महाजन या कैद्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ
उडाली. जळगाव कारागृह प्रशासनाच्या दिरंगाईने पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
याबाबत वृत्त असे की, एरंडोल येथील पवन महाजन हा कैदी जळगाव येथील कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला मधुमेहाचा त्रास होता.
मात्र याबाबतची कोणतीही माहिती जिल्हा रूग्णालयात दाखल करताना देण्यात आली नाही.
यामुळे त्यांची प्रकृती जास्त बिघडली. यानंतर रात्री त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, कारागृह प्रशासाने पवन याला रूग्णालयात दाखल करतांना कोणतीही काळजी घेतली नाही.
यामुळे प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या आप्तांनी केला आहे.
यामुळे प्रशासनावर कारवाई होत नाही तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.