धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाची 'अग्निपथ' योजना फसवी आहे. चार वर्षाच्या नोकरी नंतर तरुणांना ऐन तारुण्यात निवृत्त करण्याचा हा डाव असून तो अन्यायकारक आहे. त्यामुळे देशभर तरुणांचा उद्रेक झाला असून या तरुणांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबध्द आहे. जोपर्यंत ही योजना केंद्र सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहील अशी भूमिका घेत साक्री तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी खासदार बापुसाहेब चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, माजी जि. प. सदस्य उत्तमराव देसले, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, नगरसेवक याकुब पठाण, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, पं.स.सदस्य शांताराम कुवर, धीरज अहिरे, सुभाष काकुस्ते, रमेश गांगुर्डे, मा.पंस.सदस्य पी.एस.पाटील, धुडकू भारुडे, सोनू सूर्यवंशी, गणेश गावीत, युवा नेते पंकज सूर्यवंशी, शहराध्यक्ष प्रज्योत देसले, कालदरचे सरपंच युवराज चौरे, युवक काँग्रेसचे रणजित गवळी, ग्रामपंचायत सदस्य सागर देसले, युवा नेते नदीम पठाण, शाहरुख पठाण, अप्सर सैय्यद, असीम पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करुन अग्निपथ योजनेचा विरोध केला.