मोठा दरोडा टाकण्याचा होता हेतू ; येवल्यातून इराणी टोळीला अटक

येवला इराणी टोळी जेरबंद
येवला इराणी टोळी जेरबंद
Published on
Updated on

येवला : पुढारी वृत्तसेवा :  येवला-मनमाड मार्गावरील तांदूळवाडी फाट्यावर नाकाबंदी करत चौघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. मोठा दरोडा टाकण्याच्या हेतून ही इराणी टोळी आली होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला तालुका पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार येवला शहरात 2 आयशर ट्रकमध्ये चार ते पाच व्यक्ती दरोडा अगर मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेले आहेत. त्यानुसार येवला-मनमाड राज्यमार्गावर तांदूळवाडी फाटा येथे नाकाबंदीदरम्यान मनमाडच्या बाजूने येवल्याकडे जाणार्‍या एमएच 04 डीके 2775 व एमएच 04 ईवाय 7328 नंबरच्या आयशर थांबवल्या असता दोन्ही वाहनांत पाच व्यक्ती बसलेल्या दिसल्या. गाडी थांबवताच त्यातील एक जण लागलीच गाडीतून उडी मारून पळून गेला.

दोन्ही गाड्यांमधील सिकंदरअली यावरअली इराणी (38, रा. गेवराई, जि. बीड), अलीखान अफजल हुसेन इराणी (30, रा. नेहरूनगर, अकोला), रायतअली बबलू हुमायुअली (38, आंबेडकरनगर झोपडपट्टी, अकोला), सुधीर सिद्धार्थ कांबळे (30, अशोकनगर, अकोला) या चौघांना ताब्यात घेतले. पाचवा संशयित किसन सखाराम मंजुळकर (अमरावती) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. संशयिताकडे विचारपूस केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने त्यांच्याविरुद्ध येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. पाटील, हवालदार लक्ष्मीकांत पाठक, प्रशांत पाटील, प्रवीण सानप, गोरक्षनाथ संवत्सरकर, विश्वनाथ काकड, म्हसदे व येवला तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वल राजपूत, विजय शिंदे, दीपक सांगळे, सतीश मोरे यांनी या कारवाईत भाग घेतला.

लोखंडी टॉमी, मिरची पूड जप्त
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाइल जप्त करण्यात आले असून, दोन्ही वाहनांसह 10 लाख 25 हजार 390 रुपये व दरोड्यासाठी वापरात येणारे लोखंडी टॉमी, मिरची पूड, लाकडी दांडा, स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news