धक्कादायक! ...आणि मृतदेह घोरू लागला! | पुढारी

धक्कादायक! ...आणि मृतदेह घोरू लागला!

माद्रिद : जिवंत माणसाला ‘मृत’ घोषित करणे आणि त्यानंतरचा गोंधळ अनेक देशांमध्ये घडलेला आहे. आता स्पेनमध्ये असाच एक प्रकार घडला. तेथील एका तुरुंगातील 29 वर्षांचा कैदी गॉन्जॅलो मोंटोया जिमेनेज याला तुरुंगात असताना मृत घोषित करण्यात आले. त्याला पोस्टमार्टेमसाठी नेले जात असतानाच त्याच्या घोरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आणि आजुबाजूच्या लोकांची पाचावर धारण बसली!
2018 मधील लूट प्रकरणात तुरुंगात असलेला गॉन्जॅलो हा तुरुंगात अचेतन अवस्थेत आढळून आला होता.

त्याला विविध तीन डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे म्हटले होते. शेवटी त्याला शवगृहापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणखी एक वैद्यकीय चाचणी करण्यात आली व मृतदेह ठेवण्यासाठीच्या पिशवीत त्याचा देह ठेवून ऑटोप्सीसाठी पाठवण्यात आला. या बॅगेतून घोरण्यासारखा आवाज ऐकू येऊ लागल्याने सगळे चकीत झाले. पिशवी उघडल्यावर तो चक्क उठून बसला आणि चालूही लागला! हा कैदी जिवंत होता आणि तीन डॉक्टरांनी त्याला ‘मृत’ ठरवले होते! अखेर त्याला अन्य एका रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्याला आधी aश्वासोच्छ्वासाची तक्रार जाणवत होती असे सांगण्यात आले. जणू काही मृत्यूच्या जबड्यातून सुटून आल्यानंतर त्याने आता आपल्या पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Back to top button