नाशिक : सोमेश्वरला पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

नाशिक : सोमेश्वरला पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सोमेश्वर येथील नदीपात्रात पाय घसरुन पडलेल्या वृद्धेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) उघडकीस आली. रेखा रमेश कलंत्री (६२, रा. नाशिकरोड, तरण तलावाजवळ) यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी एकादशीनिमित्त रेखा कलंत्री देवदर्शनासाठी सोमेश्वर येथे गेल्या होत्या. तेथे नदीपात्रात पाय घसरुन पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सोमेश्वर बोट क्लब येथे त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. बोट क्लबमधील मुलांच्या मदतीने रेखा यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news