जळगाव : गुरे चारण्यासाठी गेला तो परत आलाच नाही; सकाळी डोहात आढळला मृतदेह

जळगाव : गुरे चारण्यासाठी गेला तो परत आलाच नाही; सकाळी डोहात आढळला मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : गिरणा पंपिंग परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा डोहात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केशव शंकर इंगळे (५५, रा. सावखेडा, ता. जळगाव) रविवारी (दि.१३) सकाळी गुरे चारण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. सोमवारी (दि.१४) सकाळी ८ ला त्याचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील फिल्टर प्लँट परिसरातील डोहात आढळून आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news