Video : आमदार जेव्हा ट्राफिक मोकळी करतात…,राहुल ढिकलेंनी फोडली वाहतुक कोंडी

Video : आमदार जेव्हा ट्राफिक मोकळी करतात…,राहुल ढिकलेंनी फोडली वाहतुक कोंडी
Published on
Updated on

नाशिक : (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
आजकाल चारचाकीतून जाताना साधी आपल्या कारची काचही खाली न करणारे बरेच लोकप्रतिनिधी पाहायला मिळतात. मात्र असेही काही लोकप्रतिनिधी आहेत की जे रस्त्यातील वाहतूक कोंडी पाहून स्वतः खाली उतरतात आणि वाहतूक सुरळीत करतात. क्वचितच पहायला मिळणारा हा प्रसंग रविवारी (दि.२४) रात्री नाशिक औरंगाबादरोडवर शेकडो नाशिककरांनी अनुभवला. काही वाहनधारकांनी मोबाइल कॅमेऱ्यात टिपलेल्या या प्रसंगाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सध्या लग्नतिथी दाट असल्याने नाशिक-औरंगाबाद रोडवरील बहुसंख्य लॉन्स आणि मंगल कार्यालये रविवारी फुल्ल होती. त्यामुळे या रोडवर सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती. अशातच एका विवाह सोहळ्याला जाताना नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांचेही वाहन या वाहतूक कोंडीत अडकले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून आमदार ढिकले स्वतःच रस्त्यावर उतरले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनीच वाहतूक पोलिसांची भूमिका वठवली.

काही वेळातच वाहतूक कोंडी सुरळीत झाली. येणारे-जाणारे वाहनधारकही आमदार महोदयांना रस्त्यावर पाहून नवल करीत होते. काहींनी तर ही बाब आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केल्याचे दिसून आले. त्यामुळेच आ. ढिकले यांचा वाहतूक कोंडी फोडतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.पाहा व्हिडिओ

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news