

नाशिक : एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक- वाहक म्हणून महिलांची नियुक्ती होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये आता महिलासुद्धा चालकाच्या रूपामध्ये दिसणार आहेत. नाशिक विभागात आता 194 महिला लवकरच एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून रुजू होत आहेत. त्यामुळे लवकरच नाशिकच्या एसटीचे स्टिअरिंग महिलांच्या हाती जाणार आहे.
नाशिक एसटी विभागामध्ये जवळपास 15 महिला या सध्या अंतिम प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण पूर्ण होताच शासनाच्या आदेशानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. महिला चालकांची भरती प्रक्रिया वर्ष २०१९ मध्ये राबविण्यात आली. परंतु कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण रखडले होते. गेल्या वर्षीपासून प्रशिक्षणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
महिला चालकांची सध्या 80 दिवसांची अंतिम चाचणी सुरू आहे. या 80 दिवसांमध्ये 800 किलोमीटर चालकांना पार करावा लागणार आहे. त्यानुसार महिला चालकांना रोज दहा किलोमीटरवर बस चालविणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये घाट, रात्रीच्या वेळेस येणारे अडथळे, गर्दीच्या ठिकाणी, राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. एसटीमध्ये हा नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :