पिंपळवाडीतून 15 हजारांचा ऐवज लंपास | पुढारी

पिंपळवाडीतून 15 हजारांचा ऐवज लंपास

राशीन; पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील भाऊसाहेब धावडे यांच्या वस्तीवर दुभती जनावरे चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न घरमालक जागे झाल्याने फसला. मात्र, चोरट्यांनी घरातून 15 हजारांचा ऐवज लंपास केला. पिंपळवाडी ते कुळधरण रस्त्यावर भाऊसाहेब धावडे यांची वस्ती आहे. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास धावडे यांच्या दारात बांधलेल्या दुभत्या संकरित गायी चोरट्यांना सोडून न्यायच्या होत्या. मात्र, याचवेळी जनावरांचा आवाज ऐकून धावडे यांच्या पत्नी जाग्या झाल्या. त्या घरातून बाहेर आल्या.

याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी धावडे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील रोख पाच हजार, धावडे यांची कर्णफुले असा पंधरा हजारांचा ऐवज पळविला. तिघा चोरट्यांनी धावडे यांच्या पत्नीला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचे धावडे यांनी सांगितले.
याबाबत राशीन पोलिसात तक्रार दिल्याचे धावडे यांनी सांगितले. दरम्यान, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button