नाशिक : एटीएमद्वारे पाच रुपयांत दहा लिटर पाणी

वावी : शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएम सेवेच्या प्रारंभाप्रसंगी डॉ. कमलाकर कपोते, रामनाथ कर्पे, सरपंच प्रशांत कर्पे, उपसरपंच साधना घेगडमल, विजय काटे आदी.
वावी : शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएम सेवेच्या प्रारंभाप्रसंगी डॉ. कमलाकर कपोते, रामनाथ कर्पे, सरपंच प्रशांत कर्पे, उपसरपंच साधना घेगडमल, विजय काटे आदी.

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा : येथे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी सरपंच प्रशांत कर्पे यांच्या पुढाकारातून एटीएमद्वारे पाच रुपयांत दहा लिटर थंड व शुद्ध पाणी मिळणार आहे. या एटीएम सेवेचे उद्घाटन डॉ. कमलाकर कपोते यांच्या हस्ते करण्यात आले.

सरपंच कर्पे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसरपंच साधना घेगडमल, माजी सरपंच रामनाथ कर्पे, विजय काटे, कन्हैयालाल भुतडा, सदस्य संदीप राजेभोसले, रामराव ताजणे, विजय सोमाणी, प्रेमलता जाजू, मीना मंडलिक, अश्विनी वेलजाळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा पिण्यालायक नसल्याने सरपंच कर्पे यांनी वावी येथील नूतन विद्यालयाजवळील बंद पडलेली कूपनलिका सुरू केली. कूपनलिकेतूने मिळणारे पाणी फिल्टर करून त्याचा उपयोग वावी ग्रामस्थांसाठी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाण्यापासून अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे वावी ग्रामपंचायतीने वावीकरांसाठी पाण्याचे एटीएम सुरू केले आहे. पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर ग्रामस्थांना 10 लिटर थंड व स्वच्छ पाणी मिळणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news