सुरगाणा नगरपंचायत : भाजप-शिवसेनेकडून अर्ज दाखल ; दोन्ही अर्ज ठरले वैध

तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरसेवक विजय कानडे. समवेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समीर चव्हाण, सचिन महाले, श्याम पवार आदी.
तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना नगरसेवक विजय कानडे. समवेत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समीर चव्हाण, सचिन महाले, श्याम पवार आदी.

सुरगाणा : पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून विजय कानडे, तर शिवसेनेकडून भारत वाघमारे या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.

सुरुवातीला भाजपकडून सचिन महाले व विजय कानडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, विजय कानडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, त्यांना सूचक म्हणून नगरसेविका मालतीबाई खांडवी, तर अनुमोदक नगरसेविका जानकीबाई देशमुख आहेत. शिवसेनेकडून भारत वाघमारे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना सूचक म्हणून नगरसेवक सचिन आहेर, तर अनुमोदक नगरसेवक भगवान आहेर आहेत. हे दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी वैध ठरवले आहेत. या वेळी तहसीलदार सचिन मुळीक हे उपस्थित होते.

विजय कानडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, समीर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, तर भारत वाघमारे यांचा अर्ज दाखल करतेवेळी तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, गटनेता सचिन आहेर, नगरसेवक भगवान आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news