नाशिक : वडाळा-पाथर्डी रोडवरील श्रद्धाविहार कॉलनीतील 49 वर्षीय रहिवाशाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. संजीव लक्ष्मीकांत महाजन असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजीव यांनी मंगळवारी (दि.22) सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.