नाशिक : मुलीशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांची आत्महत्या

आत्महत्या,www.pudhari.news
आत्महत्या,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गावातील मुलीशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करीत असल्याचा आरोप करून दबाव आणल्याने दहावीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथे घडली. या प्रकरणी चांदवड पोलिसांनी 10 संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तळेगावरोही येथील शुभम राजाराम वाकचौरे (16) या विद्यार्थ्याने गुरुवारी (दि. 28) पहाटे आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शुभम हा गावातील एका मुलीशी व्हॉट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामवर चॅटिंग करीत असल्याचा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाइकांनी केला होता. त्याचा राग येऊन संबंधित मुलीचा भाऊ व त्याच्या मित्रांनी मंगळवारी रात्री 8.30 वाजता शुभम, त्याचे वडील राजाराम, आई सुनीता, आजी सुमनबाई यांना मारहाण केली. तसेच बुधवारी शुभमला 'तुला मारून टाकू', 'तुला गायब करून टाकू' असे धमकीचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले. यामुळे घाबरून जाऊन शुभमने गुरुवारी आत्महत्या केली. शुभमचे वडील राजाराम वाकचौरे यांनी चांदवड पोलिसांत तशी फिर्याद दिली असून, संबंधित मुलीशी आपल्या मुलाच्या नावाने अन्य कोणी चॅटिंग करीत असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी 10 संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news