आजचे राशिभविष्य (दि. 29 एप्रिल 2022 ) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 29 एप्रिल 2022 )

मेष : संयमाने खर्च करावा. आजारपणावर खर्च होईल. स्वयंभू होणे गरजेचे आहे. कामाला लागा. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता आहे.

वृषभ : जिद्द व सातत्य यामुळे कामे मार्गी लागतील. उधारी वसूल होईल. नवीन कामांना सुरुवात कराल. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. लाभदायक दिवस.

मिथुन : इच्छा पूर्ण होतील. जबाबदारी वाढेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल.पर्यटनाचा आनंद घ्याल.

कर्क : नियोजन आवश्यक आहे. सरकारी कामांना महत्त्व द्या. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. मनःस्वास्थ्य बिघडेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

सिंह : निराश होऊ नका. दिवस बदलतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. मनःस्ताप होण्याची शक्यता.

कन्या : वैवाहिक सौख्य उत्तम राहील. संवाद वाढेल. भागीदारीत लाभ होईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग. मान-सन्मान होतील.

तूळ : पदोन्नतीचे योग. आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. वाद-विवादात जय प्राप्त कराल. सज्जनांचा सहवास लाभेल.

वृश्चिक : उत्साह कमी होईल. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. मनःस्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. नुकसान होण्याची शक्यता आहे.

धनु : आज मनाविरुद्ध गोष्टी घडतील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. भयभीत होण्याचे प्रसंग निर्माण होतील.

मकर : कलागुणांना वाव मिळेल. लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आर्थिक प्रगती होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.

कुंभ : वस्तू हरवण्याची शक्यता. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. वाणीवर नियंत्रण गरजेचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.

मीन : आनंद प्राप्त होईल. आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

Back to top button