जळगाव : आरटीओच्‍या दाेन एजंटांना १० हजारांची लाच घेताना अटक

जळगाव :  आरटीओच्‍या दाेन एजंटांना १० हजारांची लाच घेताना अटक

प्रवासी बस हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच घेताना दोन आरटीओ एजंटांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस तक्रारदार याच्या वडिलांच्या नावावर हस्तांतर करण्याच्या आरटीओ कार्यालयात आले. बस हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात आरटीओ एजंट शुभम राजेंद्र चौधरी, (वय-२३, जळगाव) आणि राम भीमराव पाटील (वय-३७, जळगाव) यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने 10 हजार रुपयांची मागणी केली.

'एसीबी'चे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी आरटीओ कार्यालयात सापळा  लावला. शुभम चौधरी आणि राम पाटील या दाेघांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ  पकडण्यात आले.

पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स. फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रवीण पाटील, पो. कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदीप पोळ यांनी ही कारवाई केली.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news