प्रवीण दरेकर : मालेगावच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवण्यात येईल

प्रवीण दरेकर : मालेगावच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवण्यात येईल

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा ; एका विवाह सोहळ्यानिमित्त मालेगाव दौर्‍यावर आलेल्या विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची भाजपच्या पदाधिकार्‍यांशी शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. त्यात प्रामुख्याने शेतकरी अनुदान भ्रष्टाचार, तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा, गिरणा धरणावरील मच्छीमारांचा प्रश्न आदी विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. याबाबत सभागृहात आवाज उठवण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे पत्रकार परिषद रद्द करून, दरेकर यांनी केवळ भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्यासह पदाधिकार्‍यांची भेट घेत तालुक्यांवर प्रश्नांचा आढावा घेतला. तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान वाटप होताना झालेला कथित भ्रष्टाचार, शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, खतपुरवठा, ठेकेदारामुळे उपासमारी ओढवेलल्या गिरणा धरणावरील मच्छीमारांच्या समस्या आदी विषयांवर त्यांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. हे प्रश्न सभागृहात मांडण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

रासायनिक खते व खाद्याची वाढीव भावात विक्री होत असून, शेतकर्‍यांना पीकविमा व अवकाळी नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. अनेक प्रकरणांत अनियमितता आहे. कोरोनाने संकट काळात अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांकडून सक्तीने वीजबिल वसुली होत आहे. प्रसंगी वीज जोडणी तोडली जात आहे. पंतप्रधान आवास योजना यादीतून तालुक्यातील 7300 गरजू गरीब लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. मंजूर घरकुल यादीत त्रुटी असून, याबत पुन्हा सर्वेक्षण करून गरिबांना न्याय द्यावा, आदी विषयांचे निवेदन पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांनी दिले.

यावेळी भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा परिषद सदस्या मनीषा पवार, जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, उद्योग आघाडी प्रदेश समन्वयक राविश मारू, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विजय देवरे, विवेक वारुळे, दीपक देसले आदी उपस्थित होते.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news