Nashik corona cases : सक्रिय रुग्णसंख्या ‘इतक्या’ हजारांवर | पुढारी

Nashik corona cases : सक्रिय रुग्णसंख्या 'इतक्या' हजारांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी (दि.6) दिवसभरात 948 रुग्ण कोरोनामुक्त (Nashik corona cases) झाले असून, नव्याने 602 बाधित आढळून आले आहेत. कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्याही घटली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या चार हजार 801 इतकी झाली आहे.

रविवारी नाशिक शहरात (Nashik corona cases) नव्याने 230, ग्रामीण भागात 345. मालेगावमध्ये दोन व परजिल्ह्यातील 16 बाधित आढळून आले आहेत. शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन-दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या चार लाख 72 हजार 326 इतकी झाली असून, त्यापैकी चार लाख 58 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण आठ हजार 845 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सक्रिय बाधितांपैकी 986 बाधितांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. त्यातील 120 बाधितांना ऑक्सिजन व 21 रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली आहे. जिल्ह्यातील 470 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button