नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली, दाम्पत्यास गंडा | पुढारी

नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली, दाम्पत्यास गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : एटीएम पिन जनरेट करून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने दाम्पत्यास 40 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदूबाई पुंडलिक चौधरी (52, रा. पेठ रोड) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात सोनूकुमार पंचानंद सनगही (रा. बिहार) याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

इंदूबाई यांच्या फिर्यादीनुसार त्या शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी सीबीएस येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात गेल्या होत्या. एटीएमचा पिन तयार करत असताना, संशयित सोनूकुमार याने मदतीच्या बहाण्याने इंदूबाई यांच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर इंदूबाई यांचे एटीएम कार्ड वापरून बँक खात्यातून 40 हजार रुपये परस्पर काढून इंदूबाई यांना गंडा घातला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button