नाशिक : निर्दयीपणे कोंबून चालविल्या होत्या 27 म्हशी, पोलिसांनी ‘अशी’ केली सुटका

म्हशींची पोलिसांनी केली सुटका,www.pudhari.news
म्हशींची पोलिसांनी केली सुटका,www.pudhari.news

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर-शिर्डी मार्गावर हॉटेल मुंबई ढाब्याजवळ सोमवारी (दि. 16) सकाळी 11 च्या सुमारास आयशर ट्रकमधून निर्दयीपणे कोंबून घेऊन जाणार्‍या 27 म्हशींची एमआयडीसी पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी ट्रकचालक समीर अहमद खान (37, धारावी, मुंबई) यास ताब्यात घेतले आहे.

सिन्नर-शिर्डी मार्गावरून आयशर ट्रकमधून (क्र. एमच 04, जेयु 3513) बेकायदेशीरपणे व निर्दयतेने काही म्हशींची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी हॉटेल मुंबई ढाब्याजवळ सदर ट्रक अडवून पाहणी केली असता ट्रकमध्ये 27 लहान-मोठ्या म्हशी आढळून आल्या.

ट्रकचालक समीर अहमद खान एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, 4 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकदेखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, म्हशींची सुटका केल्यानंतर माळेगाव शिवारात जिंदाल फाट्यासमोरील संजय चोथवे यांच्या हरिओम गोशाळेत म्हशींनी सोडण्यात आले. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन कळकळ, विनोद इप्पर, स्वप्नील पवार तपास करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news