नगर : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात | पुढारी

नगर : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

नगर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने आमदार संग्राम जगताप अपघातात थोडक्यात बचावले आहेत.

आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला. पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला. आमदार संग्राम जगताप हे गाडीमध्ये होते. त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.

संग्राम जगताप आता मुंबईत पोहोचले असल्याची माहिती मिळत असून, ते सुखरूप आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Back to top button