श्रीमती ज्योती रामराव पाटील यांची सर फाऊंडेशन तालूका समन्वयक पदी स्तुत्य निवड
पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मैंदाणे, ता. साक्री, जि.धुळे येथील उपक्रमशील शिक्षिका ज्योती रामराव पाटील पदवीधर प्राथमिक शिक्षिका यांची नुकतीच सर फाऊंडेशन अर्थात स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या तालुका समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच कथाकथन स्पर्धेच्या सन्मान सोहळ्यात राज्य समन्वयक राजकिरण चव्हाण यांच्या हस्ते पाटील यांना निवडपत्र देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवून जबाबदारी सोपविण्यात आली. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष आश्विनी पाटील, महेंद्र विसपूते, स्मिता विसपूते, डाॅ. मंजूषा क्षीरसागर, राकेश साळूंखे, जे. एस. पाटील, राजकिरण चव्हाण व हेमलता पाटील आदी उपस्थित होते. पाटील यांच्या निवडीबद्दल प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा समन्वयक सुनिल मोरे, अविनाश पाटील, सहाय्यक प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे पी. के. ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन चौधरी, संस्थेचे अध्यक्ष उदय चौधरी अनुदानित आश्रमशाळा मैंदाणे, ता. साक्री येथील मुख्याध्यापक सुनिल कोकणी, अरुण चौरे, दिपक भामरे व येथील सहकारी शिक्षकवृंद यांनी देखील निवडीबद्दल अभिनंदन करून प्रोत्साहन दिले.