अतीक-अशरफ हत्याप्रकरण : २४ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

अतीक-अशरफ हत्याप्रकरण : २४ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड अतीक आणि अशरफ यांचे हत्याप्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचिकेवर २४ एप्रिलला सुनावणी घेण्यात येईल. अॅड. विशाल तिवारी यांनी याचिका दाखल करीत तत्काळ सुनावणीची मागणी केल्यानंतर सरन्यायाधीशांनी याप्रकरणावर सुनावणीस सहमती दर्शवली.

अतीक आणि अशरफ यांची पोलीस कोठडीत करण्यात आलेल्या हत्येनंतर याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली स्वतंत्ररित्या तपासाची मागणी करण्यात आली आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत झालेल्या १८३ एनकाउंटरचा तपास देखील सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली तज्ञ समिती मार्फत करण्याची मागणी करण्यात आली होती. तिवारी यांनी २०२० मध्ये गुंड विकास दुबे यांच्या एनकाउंटरची देखील सीबअीआय मार्फत तपासाची मागणी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button