तिहार तुरूंगाधिकाऱ्यांविरोधातील आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल, विशेष न्यायालयाने टोचले ईडीचे कान | पुढारी

तिहार तुरूंगाधिकाऱ्यांविरोधातील आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल, विशेष न्यायालयाने टोचले ईडीचे कान

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधी २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिहाड तुरुंगाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची पटियाला हाउस विशेष न्यायालयाने दखल घेतली आहे. ‘ईडी’ने पुरवणी आरोपपत्रात डी.एस.मीणा, सुंदर बोरा तसेच महेश सुंदरलाल यांना आरोपी बनवले आहे. सर्व आरोपींना आरोपपत्राची पत्र आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती ‘ईडी’ने न्यायालयाला दिली.

प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचे ईडीने नयायालयात सांगितले. पंरतु, तपास कधी पूर्ण होईल ? असा सवाल न्यायालयाने विचारला. गेल्या दोन वर्षांपासून ईडी तपास करीत आहे. विशेष म्हणजे ट्रालयमध्ये उशीर होत असल्याचा दावा आरोपींकडून करण्यात आला आहे.दरम्यान तुरूंगात असलेल्या आरोपींविरोधातील तपासाची काय स्थिती आहे? त्यांच्याविरोधातील तपास पुर्ण झाला आहे का? हे सांगावे लागेल, अशा शब्दात न्यायालयाने ईडीचे कान टोचले.

याप्रकरणात दाखल करण्यात आलेले चैथे आरोपपत्रातील आरोपींविरोधात तपास कुठल्या पातळीवर आहे, त्यांच्या विरोधात तपास पुर्ण झाला आहे का, हे देखील सांगण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. २९ एप्रिलला यासंदर्भात पुढील सुनावणी घेण्यारत येईल.

हेही वाचा : 

 

Back to top button