पिंपळनेर : पाटबंधारे विभागाच्या अभियंता सविता कुवर यांच्याकडे लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावर मिळावा या मागणीसाठीचे निवेदन देताना तालुका भाजपा पदाधिकारी. ( छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : पाटबंधारे विभागाच्या अभियंता सविता कुवर यांच्याकडे लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावर मिळावा या मागणीसाठीचे निवेदन देताना तालुका भाजपा पदाधिकारी. ( छाया: अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

Published on

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुका हा आदिवासी बहुल असून क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून मोठ्या स्तरावर व्यापलेला आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. परंतु शेतकऱ्यांना विविध कारणासाठी लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळे येथील कार्यालय गाठावे लागते. त्याला अपवाद शिरपूर असून तेथील शेतकऱ्यांना तिथेच दाखला उपलब्ध होत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी पाहता लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावर मिळावा अशी मागणी तालुका भाजपाच्या वतीने सहाय्यक अभियंता (श्रेणी-१) पाटबंधारे विभाग, साक्री यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, तालुकाउपाध्यक्ष राकेशजी दहिते, सहकार आघाडीचे विभाग संयोजक योगेश भामरे, तालुका चिटणीस सुभाष निकम यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news