पिंपळनेर : पिकअपच्या धडकेत विजेचा खांब कोसळला

पिंपळनेर : वीज वाहिनीच्या सपोर्टर खांबावर वाहन आदळल्याने कोसळलेला खांब. (छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : वीज वाहिनीच्या सपोर्टर खांबावर वाहन आदळल्याने कोसळलेला खांब. (छाया: अंबादास बेनुस्कर)
Published on
Updated on

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
नंदुरबार येथून पिंपळनेरकडे येणाऱ्या पिकअप मालवाहतूक वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विज वाहिनीच्या 'सपोर्टर' खांबावर आदळली. सिमेंटचा खांब कोसळला मात्र आजूबाजूचे खांब जवळजवळ असल्याने तारा तुटल्या नसल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील शेणपूर फाटा ते सामोडे दरम्यान म्हसदी फाट्याजवळ घडली.

पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांचे ऑर्डर केलेले 'कपबशी' माल दुकानावर पोहोचविण्यासाठी नंदुरबार येथून पिकअप (एमएच ३९ / सी-९९८६ ) मध्ये भरून चालक पार्थ ओझा व सहकारी श्रावण ठाकरे हे येत असताना शेणपूर फाट्याच्या पुढे सामोडेकडे येताना वाहनाचा गिअर बदलताना स्टेअरिंगवरचा ताबा सुटल्याने वेगात असलेले वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मेन लाईनच्या सपोर्टर खांबावर आदळले. या अपघातामुळे सिमेंटचा खांब मोडून पडला व वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डयात कोसळले. या घटनेत वाहनाचे किरकोळ नुकसान होऊन ठिसूळ असलेल्या कपबशा मात्र फुटल्या. मेन लाईनचा खांब कोसळल्यानंतर तारा तुटल्या नसल्याने अनर्थ टळला. अपघात स्थळी इतर वाहन चालकांनी वाहने थांबवून अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेजारी शेतात काम करणारे शेतकरीही यावेळी मदतीसाठी सरसावले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news