जागतिक कृषी महोत्सव : पाच जोडपी विवाहबद्ध; विविध मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : जागतिक कृषी महोत्सवात इच्छुक जोडपी विवाहबद्ध झाली. 
नाशिक : जागतिक कृषी महोत्सवात इच्छुक जोडपी विवाहबद्ध झाली. 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक कृषी महोत्सव-२०२४ व दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्र सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२७) वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पाच जोडपे विवाहबद्ध झाले. (World Agricultural Festival)

यावेळी मुंबई विवाह समुपदेशक कांचन यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांना काही मिळत नसते, ही जाणीव वैवाहिक बाबतीत ठेवल्यास वैवाहिक जीवन यशस्वी होते. लग्न जुळवणे सोपे असते परंतु त्याची आयुष्यभर गाठ टिकवणे ही मोठी कसरत असते. त्यामुळे संयम व सहनशीलता ही दोघांकडे असणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात मतभेद झाल्यास योग्य समन्वयक किंवा मध्यस्थामार्फत त्यात योग्य चर्चा करून योग्य मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय असतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध ठिकाणांहून आलेल्या उपवर वर-वधूंचा परिचय त्यांनी करून दिला. (World Agricultural Festival) यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू बाळासाहेब सावंत यांनी बोलताना, शाश्वत शेती केल्यास व ती योग्य पद्धतीने समजावून घेतल्यात शेतीला येणारा भविष्यकाळ निश्चित चांगला असेल. शेतीकडे किंवा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हे जर सूत्र अंगीकारले तर संपत्ती व समाधान हे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news