बर्नार्ड अरनॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत

बर्नार्ड अरनॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : टेस्लाचे अ‍ॅलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत राहिलेले नाहीत. फ्रान्समधील लुई व्हिटॉन मोएट हेनेसीचे (एलव्हीएमएच) सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट हे एकूण संपत्तीच्या बाबतीत त्यांना मागे टाकून पहिल्या स्थानी आले आहेत. टेस्लाचे समभाग घसरल्याने मस्क यांची एकूण संपत्ती कमी झाली व ते दुसर्‍या स्थानी आले आहेत.

'फोर्ब्स'च्या अद्ययावत अब्जाधीश यादीनुसार, अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती आता 207 अब्ज डॉलर (भारतीय चलनात सुमारे 17.20 लाख कोटी रुपये) आहे, तर अ‍ॅलन मस्क यांची एकूण संपत्ती 204 अब्ज डॉलर (सुमारे 16.96 लाख कोटी रुपये) आहे. मेझॉनचे जेफ बेझोस हे तिसर्‍या स्थानी आहेत. यादीतील पहिल्या दहांत एकाही भारतीयाचा समावेश नाही. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी 104 अब्ज डॉलरसह (सुमारे 8.64 लाख कोटी रुपये) 11 व्या स्थानावर आहेत. अदानी समूहाचे गौतम अदानी या 16 व्या स्थानी असून, त्यांची एकूण संपत्ती 75 अब्ज डॉलर (6.23 लाख कोटी रुपये) आहे.

टेस्लाच्या समभागांत यावर्षी आतापर्यंत 26 टक्क्यांवर घसरण झाली आहे. 1 जानेवारी रोजी 248.42 डॉलरवर असलेले टेस्लाचे शेअर 28 जानेवारी रोजी 183.25 पर्यंत खाली आले. मस्क यांची एकूण संपत्ती त्यामुळे घटली. दुसरीकडे, अरनॉल्ट यांच्या एव्हीएमए समूहाच्या समभागांत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बर्नार्ड अरनॉल्ट कोण?

बर्नार्ड अरनॉल्ट हे आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे जनक मानले जाते. एलव्हीएमएचअंतर्गत 60 उपकंपन्यांचे मिळून 75 लक्झरी ब्रँड आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news