Sunetra Pawar| सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय

Sunetra Pawar|दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ३४ अशा विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला.
Sunetra Pawar
Sunetra Pawar File Photo
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ३४ अशा विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला.

Sunetra Pawar
Nashik- डांबर दरवाढीचा भडका; रस्त्यांना आखाती युद्धाच्या झळा

यानिमित्ताने त्यांनी देशात विक्रमी मताधिक्याची नोंद स्वतःच्या नावावर केली. त्यांच्या विरोधातील सर्व २२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बारामतीकरांनी अजितदादांना मतातून यानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण केली. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी ५८.१७ टक्के मतदान झाले होते.

एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. ४) बारामती एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पवार यांना ईव्हीएमद्वारे २ लाख १८ हजार ८०६ मते मिळाली.

Sunetra Pawar
Nashik- येवला तहसीलमध्ये ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार

सुनेत्रा पवार यांच्या विजयाने बारामतीला दुसऱ्या महिला आमदार लाभल्या गेल्या. १९६२ साली काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे यांच्या रूपाने बारामतीला पहिल्यांदा महिला आमदार मिळाल्या होत्या. त्यानंतर १९६७ ते १९९० या काळात मतदारसंघाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

राहुरीतून भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले भरघोस मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद खंडू मोकाटे यांचा १ लाख १२ हजार ५८७ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे यांच्यासह सहा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विधानसभेच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शिवाजीराव कर्डिले विजयी झाले होते. त्यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपने त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी दिली. कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह ७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news