Sumit Pagare killed case | सुमित पगारे हत्याकांडाला नवे वळण, धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलिसांचा छापा

Sumit Pagare killed case | नाशिकरोड पोलिसांचा गोसावी नगरमध्ये रात्री उशिरा छापा; संशयितांसह परिचितांची चौकशी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : सुमित पगारे हत्याकांडाला जवळपास दोन महिने उलटत असतानाच पगारे कुटुंबीयांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या धमकीप्रकरणी पगारे कुटुंबीयांनी २६ सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर सोमवारी (दि. २८) रात्री उशिरा नाशिकरोड पोलिसांचे पथक गोसावी नगर, गोसावी वाडी परिसरात दाखल झाले. पोलिसांनी संशयित तसेच राजू शेख याच्या कुटुंबीय व परिचितांची कसून चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

सुमित पगारे हत्याकांडातील संशयित सराईत गुन्हेगार राजू शेख याने पगारे कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राजू शेख, रईस उर्फ पापा शेख, जमीर रंगरेज यांच्यासह काही संशयित अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, राजू शेख याने सुमित पगारे यांचे आत्येभाऊ सागर उर्फ बंटी मोरे यांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप कुटुंबीयांनी पोलिसांकडे सादर केली आहे.

कथित संभाषणात मोर्चा काढल्यास सर्वांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, या सर्व वक्तव्यांची सत्यता अद्याप तपासातून स्पष्ट झालेली नाही.

Crime News
Shalarth ID Scam | शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकांची स्थापना

ऑडिओ क्लिपची सत्यता, संबंधित मोबाईल क्रमांक, सीडीआर तसेच इतर तांत्रिक पुराव्यांची कायदेशीर पडताळणी करण्याची मागणी पगारे कुटुंबीयांनी केली आहे. “आमच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सुमितला न्याय मिळावा. आरोपींकडून आमच्या जीविताला धोका असल्याने कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे,” अशी मागणी काजल सुमित पगारे, रुचिका पगारे आणि कुटुंबीयांनी केली आहे.

Crime News
Meshi Disabled Brothers | आई, बहीण अन् वडिलांचे छत्र हरपले! मेशीतील दोन अपंग भावंडांवर उपासमारीची वेळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news