Meshi Disabled Brothers | आई, बहीण अन् वडिलांचे छत्र हरपले! मेशीतील दोन अपंग भावंडांवर उपासमारीची वेळ

Meshi Disabled Brothers | जन्मतः अपंग; आई, बहीण आणि मेहुण्याचेही निधन; उदरनिर्वाहाचा प्रश्न
Meshi Disabled Brothers
Meshi Disabled Brothers
Published on: 
Updated on: 

मेशी : भिला आहेर

परिस्थितीशी झुंज देत कुटुंबाचा संसार सावरणाऱ्या रघुनाथ कृष्णा वानखेडे यांना अखेर दोन जन्मतः अपंग मुलांना मागे ठेवून जगाचा निरोप घ्यावा लागला. मेशी येथील बापू आणि रवींद्र या दोन्ही भावांचा आधार असलेले वडील रघुनाथ वानखेडे यांचे दि. ५ मे २०२६ रोजी निधन झाले. आई, बहीण आणि मेहुण्याचेही निधन झाल्यामुळे आता दोन्ही भावंडांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

Meshi Disabled Brothers
नाशिक : मेशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उबाठाचे बापूसाहेब जाधव विजयी

वानखेडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच हालाखीची. रघुनाथ वानखेडे गावात चहाची हातगाडी चालवून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

त्यांना सुनिता ही मुलगी आणि बापू व रवींद्र हे दोन मुले अशी तीन अपत्ये झाली. मात्र, बापू आणि रवींद्र हे दोन्ही जन्मतः दोन्ही पायांनी अपंग. सुनिताचा विवाह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथे झाला. तिच्या संसाराची परिस्थितीही जेमतेमच होती. तिला मुलगा झाला. मात्र अल्पशा आजाराने सुनिताचे निधन झाले. काही दिवसांनी तिच्या पतीचेही दुर्दैवी निधन झाले. सुनिताच्या मुलाची जबाबदारीही कुटुंबासमोर आली.

यानंतर रघुनाथ यांच्या पत्नीचे निधन दि. २४ मे २०१५ रोजी झाले. पत्नीच्या निधनानंतर दोन्ही अपंग मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी रघुनाथ यांच्यावर आली होती. वय वाढत असतानाही त्यांनी जमेल ते काम करून मुलांची उपजीविका भागवली. बापू ४८, तर रवींद्र ३८ वर्षांचे झाले आहेत.

दोघेही जन्मतः अपंग असल्यामुळे त्यांचे विवाहही होऊ शकले नाहीत.
आता वडिलांचेही निधन झाल्यामुळे बापू आणि रवींद्र यांचा आधारच हरपला आहे. आसपासच्या छोट्या हॉटेलमध्ये मिळेल ते काम करून किंवा गावातील नागरिकांनी जेवण दिल्यास त्यावर दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Meshi Disabled Brothers
Nashik News | मेशी शिवारात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महिला ठार

विशेष म्हणजे बापू जन्मतः अपंग असतानाही त्यांना केवळ ३० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे त्यांना अपेक्षित शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.
या कुटुंबाच्या नावावर अद्याप शासकीय घरकुलही नाही.

निवारा, नियमित उत्पन्न आणि शासकीय मदतीचा अभाव यामुळे वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावंडांचे पुढील आयुष्य कसे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने या दोन्ही भावंडांची परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांना घरकुल, अपंगत्वाच्या निकषानुसार उपलब्ध शासकीय लाभ आणि उदरनिर्वाहासाठी आवश्यक मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news