Nashik Protest Video: भटक्या कुत्र्यांना पोत्यात घालून अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडलं; नोटांचा हारही घातला, नाशिकमधील व्हिडिओ व्हायरल

Nashik Stray Dog Protest Video Viral: नाशिकच्या निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
Nashik Stray Dog Protest Video Viral
Nashik Stray Dog Protest Video ViralPudhari
Published on
Updated on

Nashik Stray Dog Protest Video Viral: नाशिकमधील निफाड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे आणि नगरसेविका रूपाली रंधवे यांनी नागरिकांसह अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी चक्क पोत्यात भटके कुत्रे भरून नगरपंचायत कार्यालयात आणले आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या (CO) टेबलवर सोडले. यावेळी अधिकाऱ्याच्या खुर्चीला नोटांची माळ घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

निफाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास

नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या कुत्र्यांकडून लहान मुलांसह नागरिकांवर हल्ले होत असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून नगरपंचायत प्रशासनाकडे करण्यात आली होती.

मात्र, तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली. अखेर या नाराजीचे रूपांतर अनोख्या आंदोलनात झाले.

पोत्यात कोंबून कुत्रे थेट नगरपंचायतीत

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत नगरपंचायत कार्यालय गाठले. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे आणि नगरसेविका रूपाली रंधवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी काही कुत्र्यांना पोत्यात भरून नगरपंचायत कार्यालयात आणले. त्यानंतर मुख्य अधिकारी धीरज भामरे यांच्या केबिनमध्ये जाऊन एका कुत्र्याला थेट त्यांच्या टेबलवर सोडण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Nashik Stray Dog Protest Video Viral
UPI Charges: '40 पैसे भरल्याने तुमचा जीव जाणार नाही', UPI चार्जवर नीती आयोगाच्या VCचं वादग्रस्त वक्तव्य, लोकांचा संताप

अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातली 'नोटांची माळ'

आंदोलकांनी केवळ कुत्रे आणून प्रशासनाचा निषेध केला नाही, तर मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांची माळ घालूनही आपला संताप व्यक्त केला. भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

एका बाजूला नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना प्रशासन टेंडरच्या प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Nashik Stray Dog Protest Video Viral
Disha Salian case: तुमच्या कर्मांचे फळ आता तुमच्यासमोर... आदित्य ठाकरेंनी खुलासा करताच दिशाच्या वडिलांचे प्रसिद्धीपत्रक

'तत्काळ बंदोबस्त करा', आंदोलकांचा इशारा

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांची आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत कुत्र्यांचा धोका आणखी वाढू शकतो, अशी चिंता आंदोलकांनी व्यक्त केली.

कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विक्रम रंधवे आणि रूपाली रंधवे यांनी केली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, नगरपंचायत कार्यालयात कुत्रे आणून केलेल्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news