Sant Nivruttinath Maharaj Yatrotsav : त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी सिटीलिंकच्या जादा बस

Sant Nivruttinath Maharaj Yatrotsav : त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी सिटीलिंकच्या जादा बस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी (दि.६) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौशवारी यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाने सिटीलिंकच्या जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Sant Nivruttinath Maharaj Yatrotsav)

संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर नगरी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी यात्रोत्सवामधील प्रमुख दिवस असून वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सिटीलिंकच्या जादा बसेस सोडण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिटीलिंकच्या नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर तसेच निमाणी ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर दैनंदिन २८ बसेस एकुण १८० फेऱ्या होतात. पौशवारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत सिटीलिंकने मंगळवार (दि.६) आणि बुधवार (दि.७) असे दाेन दिवस जादा बसेसचे नियोजन केले आहे.

सिटीलिंकच्या तपोवन डेपोच्या तीन आणि नाशिकरोड डेपोच्या ११ अशा एकूण १४ जादा बसेसचे नियोजन त्र्यंबक मार्गावर करण्यात आले आहे. या वाढीव १४ बसेसच्या माध्यमातून एकूण ९० अतिरिक्त बसफेर्‍या करण्यात येणार आहे. दोन्ही दिवशी दैनंदिन २८ व अतिरिक्त १४ अशा एकूण ४२ बसेसच्या २७० फेर्‍या होणार आहे. प्रवासदरम्यान भाविकांना बसेससंदर्भात कोणताही अडचण आल्यास ८५३००५७२२२/८५३००६७२२२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news