नाशिक : जिल्ह्यातील धरणांवर आभाळमाया, एकुण पाणीसाठा ७५ टक्यांवर

गंगापूर धरण(छाया : हेमंत घोरपडे)
गंगापूर धरण(छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरल्याने गंगापूर धरणाची दारे रविवारी (दि. १०) बंद करण्यात आली. जिल्ह्यात मागील चार दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. प्रमुख चोवीस धरणांमधील एकुण उपयुक्त साठा ७५ टक्यांवर पोहचला आहे.

जुन ते ऑगस्ट या कालावधीत दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याला झोडपून काढले. सलग चार दिवस पावसाने सर्वदूर झोडपून काढले असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा जोर अधिक होता. त्यामूळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. सततच्या पावसाने धरणांचा पाणीसाठा ४९ हजार ४५८ दलघफुवर पोहचला आहे. सहा धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. बहुतांक्ष धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने त्यामधून विसर्ग करण्यात आला.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर ९५ टक्के भरले असून धरणात ५३५३ दलघफु साठा आहे. धरण समुहातील चारही प्रकल्प मिळून ९०२२ दलघफु (८९ टक्के) साठा आहे. उपलब्ध साठा बघता नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. इगतपूरीमधील दारणा समुहात सहा प्रकल्प मिळून १७ हजार ३४१ दलघफु म्हणजेच ९२ टक्के साठा आहे. पालखेड समुहातील तीन प्रकल्पात ७२७० दलघफुू (८७ टक्के) तर ओझरखेड समुहात २२८४ दलघफू (७१ टक्के) पाणी आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर समुहातील पाच प्रकल्पात १२ हजार ३१ दलघफु (५२ टक्के) व पुनद समुहात ७३ टक्के साठा आहे. सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला आहे. पण चालू महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होऊ शकते.

धरणसाठा (दलघफु)

गंगापूर ५३५३, दारणा ६८८३, काश्यपी १४४०, गौतमी-गोदावरी १४१३, आळंदी ८१६, पालखेड ५३३, करंजवण ४४४३, वाघाड २२९४, ओझरखेड १५६७, पुणेगाव ५८४, तिसगाव १३३, भावली १४३४, मचकणे ६११४, वालदेवी ११३३, कडवा १५२९, नांदुरमध्यमेश्वर २४८, भोजापूर ३१६, चणकापूर २१८७, हरणबारी ११६६, केळझर ५७२, गिरणा ८१०६, पुनद ११९४.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news