कोल्हापूरच्या गिर्यारोहकाचा नाशिकच्या पर्वतगडावर मृत्यू | पुढारी

कोल्हापूरच्या गिर्यारोहकाचा नाशिकच्या पर्वतगडावर मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-नगर भागातील गडकोट मोहिमेवर कोल्हापुरातून आलेले गिर्यारोहक राजेंद्र बिचकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

कोल्हापुरातील ट्रेकिंग ग्रुपचे सक्रिय सदस्य असलेले बिचकर हे दोन दिवसांपूर्वी नाशिक-नगर भागातील गडकोट भ्रमंतीवर आले होते. अकोले तालुक्यातील कळसुबाई पर्वतरांगा परिसरातील पर्वतगडावर मोहीम फत्ते करत असताना त्यांना दुपारी भोवळ आली आणि हृदयविकाराच्या धक्क्याने गडावरच निधन झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

कोकण, पुणे, नाशिक जिल्ह्यांत गिर्यारोहणानिमित्त ते अनेक मोहिमेत सहभागी झाले होते आणि अनेकांना प्रशिक्षणही दिले होते. गिर्यारोहकांच्या ग्रुपमध्ये ते भाई नावाने प्रसिद्ध होते. त्यांचे मूळ गाव कोडोली आहे. तेथे त्यांचे पार्थिव नेण्यात येणार आहे.

हेही वाचा :

———–

Back to top button