Nashik TCS Employee Case | मतीन पटेल यांना एसआयटीचे समन्स

Nashik TCS Employee Case | टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण, जबरदस्तीने धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात तपासाचा वेग वाढला आहे.
nida khan
TCS Nashik case Nida Khanpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण, जबरदस्तीने धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात तपासाचा वेग वाढला आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

nida khan
Nashik cattle transport: चांदवड पोलिसांची धाडसी कारवाई; चार गोवंशांची सुटका

या प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपांवरून मतीन पटेल यांची चौकशी केली जाणार आहे. टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवरील कथित अत्याचाराच्या या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रमुख संशयित निदा खान ही प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही काळ फरार होती. एसआयटीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेतले. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून तिची चौकशी सुरू आहे. या संदर्भात एसआयटीने १५०० पानांचे आरोपपत्र दोन दिवसापूर्वीच न्यायालयात दाखल केले आहे.

nida khan
Nashik Rain : येवल्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; घरांची पडझड, वीज खांब कोसळले

मात्र, मतीन पटेलची चौकशी चौकशी झाल्यानंतर पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी एक महिला संशयित आरोपी अश्विनी चेनानी हिलाही अटक करण्यात आली असून ती देखील न्यायालयीन कोठडीत आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, फरार असताना निदा खानला आश्रय देण्यात आला होता. यासंदर्भात मतीन पटेल यांचे नाव समोर आले आहे.

निदा खान आणि मतीन पटेल यांच्यात संपर्क कसा झाला. तिला आश्रय देण्यामागील नेमके कारण काय होते. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. मतीन पटेल यांना लवकरच एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. या चौकशीतून प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news