Nashik news : जि.प. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय; BLO कामासाठी प्राथमिक शाळांची वेळ बदलली

नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे
BLO SIR News
BLO SIR News
Published on
Updated on

सुनील थोरे

चांदवड : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारयादीच्या विशेष सखोल पुर्ननिरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमासाठी शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षण विभागाने १० जुलै २०२६ रोजी आदेश जारी केला आहे.

BLO SIR News
Maharashtra School Timing Change: मतदारयादी पुनरीक्षणासाठी शाळांच्या वेळेत बदल; ३० जुलैपर्यंत सकाळच्या सत्रात वर्गांचे निर्देश

आदेशानुसार, मतदार यादी पुर्ननिरिक्षणाचे काम राष्ट्रीय कर्तव्य असून ते विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना BLO म्हणून आवश्यक वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी १३ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत प्राथमिक शाळा सकाळी ७.१५ ते दुपारी १२.३० या वेळेत सुरू राहतील. शनिवारी मात्र शाळा नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रातच भरतील.

BLO SIR News
Mumbai schools: एसआयआरसाठी आता अर्धा दिवसच भरणार शाळा; आजपासून वेळापत्रकात बदल

जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना हा आदेश अधिनस्त प्राथमिक शाळांपर्यंत तातडीने पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुधारित वेळेनुसार शाळा नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांना BLO म्हणून मतदारयादी पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार असून, शाळांचे शैक्षणिक कामकाजही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news