

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील आयटी कंपनीतील प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी संशयित तंजीर इनामदार (रा. लासलगाव) याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख जून २०२४ मध्ये झाली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ पर्यंत आरोपीने तिचा विविध ठिकाणी छळ केल्याचा आरोप आहे. जवळीक साधून जबरदस्तीने मिठी मारणे, शरीरावर जखमा करणे, अश्लील फोटो काढणे तसेच सिगारेट पिण्यास भाग पाडणे असे प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जानेवारी २०२६ मध्ये आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला पेठ रोडवरील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिला जबरदस्तीने दारू पाजून अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर पीडितेच्या गळ्यातील तुळशी माळ व धार्मिक धागे काढून टाकत गजवा-हिंद च्या नावाखाली धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ झाला.
जेव्हा न्यायाधीशांनी तपासी अधिकाऱ्यांना विचारले की, आरोपीची पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार नाही ना, त्याने इतर कोणाची फसवणूक केली आहे का, त्याला कोणती आर्थिक मदत मिळाली आहे का, त्याला जिथे जिथे नेण्यात आले, त्या सर्व ठिकाणांची चौकशी झाली पाहिजे.
- ज्योती आमणे, पोलिस निरीक्षक, तपास अधिकारी
आम्हाला तपासात त्याने यापूर्वी इतर मुलींची फसवणूक केली आहे का, लॉजमध्ये राहण्यासाठी महागडी दारू आणि इतर खर्चासाठी त्याला इतके पैसे कोठून मिळाले, याचा शोध घ्यायचा आहे. लॉजमध्ये जेव्हा ती नकार द्यायची, तेव्हा तो तिच्या मानेवर कापायचा आणि विचारले असता सांगायचा की हा लव्ह बाईट आहे. त्याने स्वतःच्या धर्माचा उल्लेख करत असेही म्हटले की त्याला गजवा-ए-हिंद करायचे आहे. हे प्रकरण एखाद्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीशी संबंधित प्रकरणासारखे आहे का, हे आम्हाला तपासायचे आहे.
- अॅड. मनीषा वारुंगसे, सरकारी वकील