Nashik News I जागतिक कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण

नाशिक : येथील डोंगरी वसतीगृह मैदानावर होत असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाची आंतिम टप्यात आलेली तयारी. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : येथील डोंगरी वसतीगृह मैदानावर होत असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाची आंतिम टप्यात आलेली तयारी. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील गंगापूर रोडवर होत असलेल्या दिंडोरीप्रणीत सेवामार्ग जागतिक कृषी महोत्सवाची (World Agricultural Festival) तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बुधवारी (दि. 24) राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सेवामार्गाचे कृषिशास्त्र विभागाचे समन्वयक आबासाहेब मोरे यांनी दिली.

महोत्सवात (World Agricultural Festival) लाखो शेतकरी, सेवेकरी, भाविक, विद्यार्थी, कृषी अभ्यासक, संशोधक, व्यापारी, संस्था, लहान-मोठे उद्योजक हे वर्षभर सहभागी होणार आहेत. या महोत्सवात दुर्गसंवर्धन अभियान अंतर्गत ५०० हून अधिक प्राचीन शस्त्र-अस्त्र प्रदर्शनासह मोडी लिपी, शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके व शेतकरी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पाचदिवसीय महोत्सवात कृषी सांस्कृतिक सोहळा, विषमुक्त शेती, दुग्ध व्यवसाय, पर्यावरण व दुर्ग संवर्धन, स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मेळावा, माहिती व तंत्रज्ञान जनजागृती सायबर सुरक्षा तसेच सरपंच ग्रामसेवक मांदियाळी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

'शेतकरी मुला-मुलींचे लग्न' या विषयावर व्याख्यान
सध्याच्या तरुणाईचा गंभीर प्रश्न झालेल्या 'शेतकरी मुला-मुलींचे लग्न' या विषयावर या महोत्सवात विशेष व्याख्यान तसेच शेतकरी वधू-वर परिचय मेळावा होणार आहे. सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या या विषयामुळे अनेकांना लाभ होणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news